जुलै महिन्यातील प्रस्ताव

आपल्या वारकरी संतांनी लोकांच्या मनात समता, प्रेम, बंधुता, मानवता ह्या मूल्यांची पेरणी केली. लोकांना अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड यांतून बाहेर काढण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. लोककल्याण हाच वारकरी संप्रदायाच्या विचारांचा गाभा आहे. आणि हाच विचारांचा वारसा बाबासाहेबांच्या लेखणीतून भारतीय संविधानात आला आहे. समतेचा विचार मांडणारा हा वारसा जपणे जपणं आणि इतरां पर्यंत पोचावं आपलं सर्वांचं आहे.

वारी निमित्त आपण खालील उपक्रम शकतो:
१) संत विचारांचे पत्रक आपल्या सोसायटी, वस्ती मद्ये वाटून चर्चा करू शकतो.
२) विविध कार्यक्रमांमध्ये चित्रमय पुस्तिकेचे वाटप करू शकतो.
३) अभंगांचे निरूपण करून अभंग बैठक आयोजित करू शकतो.

संविधान घराघरात पोहचवूया!


देऊन गोडवा चमचाभर साखरेचा,
करू जागर भारतीय संविधानाचा

घरोघरी जाऊन, साखर देऊन, तोंड गोड करा आणि लोकांशी संविधानाबद्दल संवाद करा. संविधानावरील पत्रक त्यांना देऊ शकता. पत्रक इथून डाउनलोड करू शकता.

संविधान उद्देशिका समजावून सांगूयात

संविधान उद्देशिकेतील शब्दांची व संविधान मूल्यांची सोप्या उदाहरणांनी संवादात्मक भाषेत मुलांना सांगणे.

संविधान खेळ

समता, बंधुता या मूल्यांना खेळाच्या माध्यमातून हसत खेळत समजून घेणे.

संविधान ज्ञान परीक्षा

संविधानाची रंगीत चित्रमय पॉकेट पुस्तिका (रु. 15) छापली आहे. त्यावर प्रश्नपत्रिका तयार आहे. आपण आपल्या किंवा शेजारील शाळेत त्यावर परीक्षा घेऊ शकता. त्याचे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना देऊ शकता.

प्रश्नपत्रिका संच इथून डाउनलोड करू शकता.

प्रमाणपत्रासाठी आम्हाला संपर्क साधू शकता.

परिपाठात संविधान प्रास्ताविका ओळख आठवडा

प्रास्ताविकेतील शब्दांची ओळख करून देणारी 5 मिनिटांची संवादात्मक स्क्रिप्ट आपण सादर करू शकता.

संविधान शपथ

संविधान दिनी आपण संविधानावरील शपथ शाळा-कॉलेजमध्ये घेऊ शकता.

संविधान दालन

खालील लिंकवरून आपण A2/A3 साईझचे पोस्टर छापून आपल्या शाळेच्या-संस्थेच्या आवारात लावू शकता.

संविधान पत्र वाचन

विद्यार्थ्यांच्या मार्फत संविधानाने मला काय दिले हे सांगणारे पत्र आपल्या घरी-शेजारी वाचू शकतात. पत्र इथून डाउनलोड करू शकता.

आपलं संविधान – चित्रमय पुस्तिका

साध्या सोप्या भाषेत संविधान समजून देणारी चित्रमय पुस्तिका वाटप करू शकता.

संविधान जागर अभियान


संविधान जागर अभियानात सहभागी व्हा!