26 जानेवारी ते 26 नोव्हेंबर 2025 या काळात विविध सामाजिक दृष्टिकोनांमधून संविधानातील मूल्ये, हक्क आणि अधिकार यांचा जागर करणारे महाराष्ट्र राज्यव्यापी अभियान!

संविधान जागर अभियान
भारतीय संविधान म्हणजे एक करुणेचा, मानवतेचा व प्रगतीचा प्रकाशदीप आहे. संविधानाने सर्व प्रौढ नागरिकांना मतदानाचा हक्क दिला. स्त्री-पुरुष समानतेचे मूल्य दिले. गरीबांना, वंचितांना पुढे जाण्याची संधी दिली. या देशातील विविधतेचा सन्मान केला.
व्यक्ती कोणत्याही धर्म, जात, लिंग, प्रांताचा असो, प्रत्येक भारतीयाचा भारतावर आणि संविधानावर समान हक्क आहे. अशाप्रकारे संविधानाने प्रत्येक भारतीयाला सामावून घेतले.
आपल्या गावातील शाळा, दवाखाने, रस्ता, वीज, पिण्याचे पाणी, आणि देशाचा 75 वर्षातला विकाससुद्धा संविधानामुळेच शक्य झाला. विज्ञान, तंत्रज्ञान आणि अवकाशापर्यंत आपण पोहोचलो.
“जेव्हा तुम्ही गोंधळलेले असाल, आणि काय निर्णय घ्यायचा हे तुम्हाला कळत नसेल, तेव्हा तुमच्या आयुष्यातल्या सर्वात गरीब, दुबळ्या माणसाला आठवा आणि तुमचे पाऊल त्याच्यासाठी आहे ना, याची खात्री करा” असं महात्मा गांधी म्हणायचे. याच प्रेरणेने आपलं संविधान देखील समाजातील शेवटच्या माणसाचा विचार करून बनवलं गेलं आहे.
संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, “सामाजिक चेतना हीच आपल्या हक्कांची खात्री असते.” म्हणजे लोक जागृत असले तरंच संविधानाने दिलेले हक्क मिळू शकतात.
आपल्या संविधानाला यंदा 75 वर्षे पूर्ण होत आहेत. चला, संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने लोकांपर्यंत भारतीय संविधानाचा विचार घेऊन जाऊया…
संविधान जागर अभियान निमंत्रक समिती:
न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, तुषार गांधी, प्रा. डॉ. सुखदेव थोरात,
राम पुनियानी, डॉ. नितीन राऊत, उत्तम कांबळे, धनाजी गुरव, नीरज जैन
अधिक माहितीसाठी संपर्क:
स्वप्नील फुसे – 79723 45764
नागार्जुन वाडेकर – 98602 39899
राजाभाऊ करवाडे – 98222 02739
अभियानाकरिता लागणारे विविध साहित्य नक्की डाउनलोड करा:

सार्वजनिक बैठकांमध्ये घ्यावयाची संविधानाची शपथ!

संविधानाची 75 वर्षे आणि त्यातून जनतेला मिळालेले फायदे अधोरेखित करणारे पत्रक, तुम्ही गरजेनुसार बदल करून छापू शकता!

घराच्या दारावर, गाडीवर तसेच वही-पुस्तकांवर लावण्याचे स्टिकर! छापून आवर्जून नक्की लावा!

लहान मुलांनी घरोघरी जाऊन वाचून दाखवायचे पत्र
लहान मुलांकडून हे पत्र नक्की वाचून घ्या !

संविधान ज्ञान परीक्षा लहान गट – class 4 & 5

संविधान ज्ञान परीक्षा मोठा गट – class 6-7-8