एप्रिल महिन्याचे उपक्रम

महात्मा फुले जयंती: शिक्षक सन्मान दिन पाळूया.

11 एप्रिल 2025

महात्मा ज्योतीराव फुले यांनी शिक्षणापासून वंचित ठेवल्या गेलेले लोक आणि महिलांसाठी शिक्षणाची दारे उघडली. ते आपल्या सगळ्यांचे आद्य शिक्षक आहेत. त्यांच्या आठवणीत आपण आपल्या शिक्षकांचा सत्कार करूया. ते करताना त्यांना एक सन्मानपत्र देऊया. (सन्मानपत्र निमंत्रण समिती पाठवेल)

पत्रक डाऊनलोड करण्यासाठी खाली फोटोवर क्लिक करा.

शिक्षक सन्मानपत्र डाऊनलोड करण्यासाठी खाली फोटोवर क्लिक करा.

स्टिकर डाऊनलोड करण्यासाठी खाली फोटोवर क्लिक करा.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान

14 एप्रिल 2025

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय घटनेचे शिल्पकार आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त आनंदोत्सव साजरा करताना, आणि त्यांना अभिवादन करताना त्यांचे संविधानविषयक कार्य आणि देशाच्या निर्मितीमध्ये मोलाचे योगदा लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आपण खालील उपक्रम करू शकतो.
🔹 शाळा/कॉलेज/कार्यालयात/सार्वजनिक ठिकाणी – बाबासाहेबांच्या प्रतिमेला/पुतळ्याला अभिवादन करूया. त्या ठिकाणी पत्रक वाटून त्याचे वाचन करूया आणि सामुहिकरित्या भीमप्रतिज्ञा घेऊया. (पत्रक व भीमप्रतिज्ञा समिती पाठवेल)
🔹 वाचन शिबीर – चला महात्मा फुले, बाबासाहेब आणि संविधान वाचूया.. (Lets Read Phule, Ambedkar and Constitution)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तासन् तास अभ्यास करायचे. त्यांना अभिवादन म्हणून आपणही सलग 10 तास वाचन करूया.
🔹 संविधानाला 75 वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान’ या विषयावर 75 घरी पत्रक देऊन संवाद करूया. (पत्रक निमंत्रक समिती पाठवेल)

🔹डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे व्यापक जीवनकार्य उलगडणारे पोस्टर प्रदर्शन विविध ठिकाणी लावूया.

पत्रक: (डाउनलोड करण्यासाठी फोटोवर क्लिक करा)

पोस्टर प्रदर्शन (बॅनर): डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे व्यापक जीवनकार्य उलगडणारे
7 पोस्टर/बॅनर (डाउनलोड करण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा)

स्टिकर डाऊनलोड करण्यासाठी खाली फोटोवर क्लिक करा.


राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती निमित्त संविधान जागर अभियानाचे आवाहन
शाळा/कॉलेज/उद्याने/सार्वजनिक ठिकाणी ‘या भारतात बंधुभाव नित्य वसू दे’ ही प्रार्थना घेऊन तेथे पत्रकाचे वाचन आणि वाटप करुन लोकांशी संवाद करूया.


पत्रक: (डाउनलोड करण्यासाठी फोटोवर क्लिक करा)

स्टिकर डाऊनलोड करण्यासाठी खाली फोटोवर क्लिक करा.