गौतम बुद्धांनी जगाला शांती, अहिंसा, समता आणि करुणेचा संदेश दिला. त्यांनी चार आर्यसत्य आणि अष्टांगिक मार्गाची शिकवण दिली. मनुष्य प्राण्याला ‘माणूस’ बनवण्यासाठी त्यांनी आपले अवघे आयुष्य अर्पण केले. बौद्ध पौर्णिमा (बुद्ध जयंती) हा गौतम बुद्धांच्या जीवनातील तीन महत्त्वाच्या घटनांची आठवण करून देणारा पवित्र दिवस आहे. या दिवशी त्यांचा जन्म झाला, या दिवशी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि याच दिवशी त्यांचे महापरिनिर्वाण झाले.

