14 एप्रिल
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय घटनेचे शिल्पकार आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त आनंदोत्सव साजरा करताना, आणि त्यांना अभिवादन करताना त्यांचे संविधानविषयक कार्य आणि देशाच्या निर्मितीमध्ये मोलाचे योगदा लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आपण खालील उपक्रम करू शकतो.
🔹 शाळा/कॉलेज/कार्यालयात/सार्वजनिक ठिकाणी – बाबासाहेबांच्या प्रतिमेला/पुतळ्याला अभिवादन करूया. त्या ठिकाणी पत्रक वाटून त्याचे वाचन करूया आणि सामुहिकरित्या भीमप्रतिज्ञा घेऊया. (पत्रक व भीमप्रतिज्ञा समिती पाठवेल)
🔹 वाचन शिबीर – चला महात्मा फुले, बाबासाहेब आणि संविधान वाचूया.. (Lets Read Phule, Ambedkar and Constitution)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तासन् तास अभ्यास करायचे. त्यांना अभिवादन म्हणून आपणही सलग 10 तास वाचन करूया.
🔹 संविधानाला 75 वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान’ या विषयावर 75 घरी पत्रक देऊन संवाद करूया. (पत्रक निमंत्रक समिती पाठवेल)
🔹डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे व्यापक जीवनकार्य उलगडणारे पोस्टर प्रदर्शन विविध ठिकाणी लावूया.



शिक्षक सन्मान
महात्मा जोतीराव फुले यांनी शिक्षणाचा हक्क नाकारलेल्या महिलांसाठी आणि बहुजनांसाठी शिक्षणाची दारे उघडली. ते आपल्या सगळ्यांचे आद्य शिक्षक आहेत. त्यांच्या आठवणीत आपण आपल्या शिक्षकांचा सत्कार करूया. ते करताना त्यांना एक सन्मानपत्र देऊया. सन्मान पत्रासाठी संपर्क करा.
भीम प्रतिज्ञा
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या मार्गावर चालण्याचा वसा घेणारी प्रतिज्ञा ठिकठिकाणी कार्यक्रमात घेऊया.
बाबासाहेब संविधान सेल्फी बॅनर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान सोपवतानाचा एक सेल्फी बॅनर तयार करून आपण मंडळ/शाळा/कॉलेज/कॉलनी/किंवा कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी ठेवून लोकांना सेल्फी काढण्यासाठी आवाहन करू शकता. त्यांसोबत संविधानावर चर्चा करू शकता.



