संविधान दिन

26 नोव्हेंबर, संविधान दिनानिमित्त आपण एक तरी उपक्रम राबवूयात आणि संविधानाचा प्रचार प्रसार करूयात.

एक व्यक्ती – एक उपक्रम राबवूयात, संविधान घराघरात पोहचवूया!


देऊन गोडवा चमचाभर साखरेचा, करू जागर भारतीय संविधानाचा!

10 घरांमध्ये जाऊन साखर देऊन तोंड गोड करा आणि लोकांशी संविधानाबद्दल संवाद करा. संविधानावरील पत्रक त्यांना देऊ शकता.





संविधान ज्ञान परीक्षा

संविधानाची रंगीत चित्रमय पॉकेट पुस्तिका (रु. 15) छापली आहे. त्यावर प्रश्नपत्रिका तयार आहे.
आपण आपल्या किंवा शेजारील शाळेत त्यावर परीक्षा घेऊ शकता.
त्याचे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना द्या, प्रमाणपत्रासाठी संपर्क करा:


संविधान दालन

खालील लिंकवरून आपण A2/A3 साईझचे पोस्टर छापून आपल्या शाळेच्या-संस्थेच्या आवारात लावू शकता.


संविधान शपथ

संविधान दिनी आपण संविधानावरील शपथ शाळा-कॉलेजमध्ये घेऊ शकता.


आपलं संविधान – चित्रमय पुस्तिका

साध्या सोप्या भाषेत संविधान समजून देणारी चित्रमय पुस्तिका वाटप करू शकता


संविधान खेळ

समता, बंधुता या मूल्यांना खेळाच्या माध्यमातून हसत खेळत समजून घेणे.


इतर कार्यक्रम

संविधान उद्देशिका समजावून सांगूयात
संविधान उद्देशिकेतील शब्दांची व संविधान मूल्यांची सोप्या उदाहरणांनी संवादात्मक भाषेत मुलांना सांगणे.

संविधान पत्र वाचन
विद्यार्थ्यांच्या मार्फत संविधानाने मला काय दिले हे सांगणारे पत्र आपल्या घरी, शेजारी वाचू शकतात.

परिपाठात संविधान प्रास्ताविका ओळख आठवडा
प्रास्ताविकेतील शब्दांची ओळख करून देणारी 5 मिनिटांची संवादात्मक स्क्रिप्ट आपण सादर करू शकता.

उपक्रम झाल्यावर त्या त्या उपक्रमाचे फोटो आणि थोडक्यात प्रतिक्रिया नक्की पाठवा!