छत्रपती शिवाजी महाराज जयंती
19 फेब्रुवारी 2025
छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जाती आणि विविध धर्माच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी गोरगरीब रयतेची, त्यांच्या शेतीची आणि आया बहिणींच्या अब्रूची काळजी घेतली. शिवरायांनी कधीही जाती-धर्मावरून भेदभाव केला नाही. म्हणून सर्वसामान्य रयत राजांसाठी स्वत:चा जीव द्यायला तयार झाली.
छत्रपती शिवरायांचे लोककल्याणाचे, सामाजिक न्यायाचे, धर्मनिरपेक्षतेचे व महिला-सन्मानाचे धोरण हे भारतीय संविधानाशी अगदी सुसंगत आहेत. त्यामुळे संविधान जागर अभियानाकडून शिवजयंती निमित्त विविध उपक्रम राबवले जात आहेत.
चला, शिवरायांचे सच्चे मावळे बनूया, त्यांच्या कल्याणकारी धोरणांचा जागर करूया आणि ही शिवजयंती विचारांची जयंती म्हणून साजरी करूया!
शिवजयंती निमित्त उपक्रमांचे प्रस्ताव:
1. घरात/कार्यालयात छ.शिवरायांचा फोटो/मूर्तीला पूष्पहार अर्पण करून अभिवादन करू शकतो. यासाठी मित्रपरिवाराला आमंत्रित करून, त्यांना शिवशपथ व पत्रक देऊन संवाद करू शकतो.
2. पत्रक व शिवशपथ – शिवरायांच्या विचारांवर चालण्याची शपथ. मंडळे/शाळा/कॉलेज/वसतीगृहे येथे पत्रक व शिवशपथ देऊ शकतो. (शपथ घेतानाचा विडीओ सोशल मिडीयावर जरूर टाका.)
3. रयतेच्या कल्याणाची ‘शिवज्योत’ : छ. शिवरायांच्या पुतळ्यापासून किंवा किल्ल्यापासून मशाल प्रज्वलित करून आणू शकतो. वाटेत लोकांना पत्रके आणि शिवशपथ देऊ शकतो. यात प्रामुख्याने तरूण वर्ग सहभागी होऊ शकेल.
4. “स्वराज्याचे तोरण” – छ. शिवाजी महाराजांचे विचार प्रदर्शित करणारे तोरण घराच्या दरवाज्याला लावू शकतो. (याचा विडीओ/फोटो सोशल मिडीयावर टाका)
5. पोस्टर्स/फ्लेक्स आणि स्टिकर्स: छ. शिवरायांच्या कल्याणकारी धोरणांना प्रदर्शित करणारे पोस्टर/फ्लेक्स लावणार/मंडळांना देऊन त्यांना लावायला सांगू शकतो.
6. ‘गाथा रयतेच्या राजाची’ ऑडिओ सांस्कृतिक कार्यक्रम: जवळच्या मंडळांमध्ये छ. शिवरायांच्या कल्याणकारी धोरणांचा जागर करणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाची रेकॉर्डींग लावू शकतो. (कालावधी: अर्धा तास)
7. शाळा/कॉलेजमध्ये – छ. शिवरायांच्या इतिहासावर परिक्षा. या स्पर्धेसाठी अभ्यास म्हणून छ. शिवाजी महाराजांचे कल्याणकारी धोरणे मांडणारी पुस्तिका विद्यार्थ्यांना विकत घ्यायला सांगू शकतो. आणि त्यावर परिक्षा घेऊ शकतो.
8. स्टेटस – पुढील काही दिवसांसाठी छ. शिवरायांच्या विचारांचे रोज 1 स्टेटस ठेवू शकतो.
वरील उपक्रमांसाठी लागणारे साहित्य खाली दिले आहे.
संत रविदास जयंती
12 फेब्रुवारी 2025
‘ऐसा चाहूं राज मैं, जहां मिले सबन को अन्न,
छोट बड़ा सब संग बसे रैदास रहे प्रसन्न’
अशाप्रकारे संत रविदास समतापूर्ण आणि समाजवादी समाजाची कल्पना मांडतात. ही कल्पना संविधानाच्या मार्गदर्शक तत्त्वांशी अगदी सुसंगत आहे. त्यामुळे,
- ज्या ठिकाणी संत रविदास जयंती साजरी होते तेथे सामील होणे आणि लोकांसोबत संत रोहिदास विचार आणि संविधान यावर संवाद साधणे
- यासाठीचे पत्रक व स्टिकर डाउनलोड करा:
संत गाडगेबाबा जयंती
23 फेब्रुवारी 2025
“भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, गरीब मुलांना शिक्षण
बेरोजगारांना रोजगार, बेघराला आधार, उघड्या-नागड्यांना कपडे,
आजारी लोकांना औषध, मूक प्राण्यांना संरक्षण, गरीब लेकरांचे लग्न सुगम करणे…
हाच खरा धर्म, हीच खरी भक्ती अन् दरिद्रीनारायणाची सेवा हीच खरी देवपूजा “
संत गाडगेबाबांची दशसुत्री अंमलात आणणे म्हणजे लोककल्याण करणे. हाच आपल्या संविधानाचा मुख्य उद्देश्य आहे. त्यामुळे,
- ज्या ठिकाणी संत गाडगेबाबा जयंती साजरी होते तेथे सामील होणे आणि लोकांसोबत संत गाडगेबाबा विचार आणि संविधान यावर संवाद साधणे
- यासाठीचे पत्रक व स्टिकर डाउनलोड करा: