महिलांचा करा सन्मान, सांगतय आपलं संविधान

8 मार्च

तुम्हाला 8 मार्च – जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! महिलांनी आपल्या अधिकारांसाठी केलेल्या संघर्षाचे स्मरण करून समानतेसाठी आपला लढा दृढ करण्याचा दिवस म्हणून जगभरात 8 मार्च हा महिला दिन म्हणून पाळला जातो.

भारतातील महिलांना सर्वप्रथम हक्क प्रदान केले ते भारतीय संविधानाने!समानता, स्वातंत्र्य व सन्मान ही केवळ संविधानातील शब्द नसून स्त्रीच्या जगण्याची मूलभूत तत्त्वे आहेत. संविधानाने महिलांना अधिकार दिले, पण त्यांचा प्रत्यक्ष अनुभव तेव्हाच येईल, जेव्हा समाज म्हणून आपण ते अधिकार मान्य करू, पाळू आणि संरक्षण करू. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, स्त्रीच्या निर्णय स्वातंत्र्याचा सन्मान करणे आणि समानतेसाठी संघटित होणे—हाच संविधानाचा खरा अर्थ आहे.

चला, संविधानाचा जागर करूया, संविधानाने सांगितल्याप्रमाणे महिलांचा सन्मान करूया, महिलांचे हक्क आणि अधिकार सर्वांपर्यंत पोहचवुया!

महिला दिनानिमित्त उपक्रमांचे प्रस्ताव:

संविधानाने महिलांना दिलेले हक्क आणि अधिकार

  • याविषयी ठिकठिकाणी पत्रक वाटून आपण जनजागृती करू शकता.
  • जर आपणास यावर कुठे जाहीर व्याख्यान किंवा भाषण द्यायचे असल्यास त्यासंबंधित पीपीटी प्रेझेंटेशन आणि भाषण स्क्रिप्ट देखील वेबसाईट वर उपलब्ध आहे.

महिला सन्मान शपथ

आपण आपल्या सोसायटी/मोहल्ला/वस्ती मध्ये लोकांना गोळा करून शपथ देऊ शकतो. आपण जिथे काम करतो, मित्रांमध्ये शपत देऊ शकतो. तसेच शाळांमध्ये/कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शपथ देऊ शकतो. सोबत पत्रकं वाटू शकतो.

संघर्षशील महिलांचा सन्मान

संघर्षातून उभ्या राहिलेल्या – विधवा किंवा एकल महिला, प्रतिकूल परिस्थितील शिक्षण घेतलेल्या, सामाजिक जाणीव असलेल्या, घरगुती आणि लैंगिक हिंसाचाराच्या विरोधात लढलेल्या, कर्मचारी युनियनचे काम करणाऱ्या, समाजाने आखून दिलेल्या चूल व मूल ह्या चाकोरीच्या पलीकडे जाऊन काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करणे. त्यासाठी लागणारे सन्मान प्रमाणपत्रासाठी आपण आम्हाला संपर्क करू शकता.

छोटी चित्रमय पुस्तिका: महिलांचा सन्मान, भारतीय संविधान

भारतीय संविधानाने महिलांना दिलेल्या सन्मान, हक्क व समतेचा अर्थ चित्रमय पद्धतीने उलगडणारी ही पुस्तिका आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवूया!

संविधान सभेतील 15 महिला विषयी

  • यावरील पोस्टर प्रदर्शन आपण शाळेत किंवा कॉलेजमध्ये लावून जनजागृती करू शकता.
  • यावरील पोस्टर आपण शाळा कॉलेज किंवा ऑफिसमध्ये लावू शकता.
  • संविधान सभेतील 15 महिलांची माहिती सांगणारा कार्यक्रम करू शकता.

आम्ही संविधान सभेतील महिला बोलतोय

संविधान सभेतील 15 महिलांविषयी त्या भूमिकेत जाऊन 15 महिलांना घेऊन त्यांची भूमिका आणि जीवनपट सादर करणारा कार्यक्रम करू शकता.

पोस्टर प्रदर्शन लावण्याचे आवाहन

  • स्वातंत्र्यलढ्यातील सहभागी महिलांवरील पोस्टर प्रदर्शन लावून जनजागृती करू शकता.
  • देशाच्या उभारणीमध्ये विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांवर पोस्टर प्रदर्शन लावून जनजागृती करू शकता.

नाटक

  • संविधान आणि महिला विषयावर स्त्री शक्तीचा जागर नाटक
  • संविधान आणि महिला विषयावर कॉलेज मुलींसाठी नाटक

इतर उपक्रम

  • शालेय विद्यार्थ्यांसाठी महिलांचे (संत, स्वातंत्र सैनिक, समाजसुधारक) लघु “आत्मचरित्र” तयार करून ते विद्यार्थ्यांना परिपाठामध्ये वाचायला देऊ शकता.
  • प्रेरणादायी गाण्यांवर महिला व मुलींचा डान्स बसवणे.
  • स्त्री-पुरुष समानतेच्या मूल्यांशी व महिलांच्या संघर्षाची गाणी व कविता यांचे सादरीकरण करू शकता.
  • संविधान आणि महिला याविषयाला धरून नाटक/ रिल्स/ प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करु शकता.